🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वाळुंजनगरमध्ये श्री कमळजादेवी उत्सवाचा भक्तिमय सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन! सुरेंद्र सोनवणे, पुणे प्रतिनिधी | Need 24 News

✍️ Reporter: Surendra Uttam Sonawane 🗓 16 Nov 2026, 04:03 PM 👁 57
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
लोणी (ता. आंबेगाव) : वाळुंजनगर (लोणी) येथे ग्रामदैवत श्री कमळजादेवी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कमळजादेवी ग्रामविकास प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ मंडळी वाळुंजनगर यांच्या वतीने हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे.

उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी देवीचा अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दुपारी देवीची काठी मिरवणूक, सायंकाळी हरिकीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या कार्यक्रमानुसार पहाटे ४ ते ६ या वेळेत काकड आरती, सकाळी ६ ते ८ देवीचा अभिषेक, सकाळी ८ ते १० सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ ते ३ देवीची काठी मिरवणूक, तर सायंकाळी ३.३० ते ५.३० हरिकीर्तन होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री ९ ते ११ या वेळेत भागवताचार्य ह.भ.प. श्री गणेश महाराज शिंदे (उदापूरकर), किल्ले शिवनेरी यांचे कीर्तन होणार आहे. तसेच वाळुंजनगर, खडकवाडी, पैसावस्ती, रानमळा, लोणी, पैसा गलठा आणि वडगावपीर येथील भजनी मंडळांची कीर्तनसाथ लाभणार आहे.

कै. सौ. राधाबाई व स्व. झुंबरशेठ लहाने वाळुंज यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फुले, हार-तुरे व मंदिर सजावटीसाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले आहे.

या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, भक्तिभाव आणि ग्रामस्थांमधील एकोपा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री कमळजादेवीचे दर्शन घ्यावे व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कमळजादेवी ग्रामविकास प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ मंडळी वाळुंजनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App