🔥 TRENDING Haryana Pan Masala Firm Evades Rs 116.... Haryana's Saini Highlights Jobs, Inves... Former Haryana Minister Phool Chand Mu... Rajasthan and MP Hit 6°C & 7°C as Fog... CG HC Criticises Bilaspur Municipal Co... SBI Clerk 2026 Prelims Cut‑Off Marks R...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वडवलीत बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास आगीच्या भक्ष्यस्थानी; ५०० भारे आणि उभे पीक जळून खाक!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 09 Nov 2026, 06:20 PM 👁 421
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
वडवलीत बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास आगीच्या भक्ष्यस्थानी; ५०० भारे आणि उभे पीक जळून खाक!
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड, दि. ९ /११/२०२६ ब्रेकिंग न्युज मुरबाड सरळगांव
(प्रतिनिधी): मुरबाड तालुक्यातील मौजे वडवली गावच्या शिवारात भात शेतीच्या खळ्याला अचानक भीषण आग लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत रचून ठेवलेले भाताचे अंदाजे ५०० भारे आणि उभे भात पीक जळून खाक झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
या आगीत वडवली येथील शेतकरी कृष्णा जामघरे, नारायण रामचंद्र शेळके, सचिन जयराम गायकवाड, गणेश अमृता शिंगोले आणि रमेश कृष्णा कराळे यांचे खळ्यातील भाताचे भारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच, शेतकरी अनंता मुकुंद अधिकारी यांच्या शेतातील कापणीला आलेले उभे भात पीकही या आगीत पूर्णपणे जळून नष्ट झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, वाऱ्याच्या वेगामुळे आणि सुक्या पेंढ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठी वित्तहानी झाली. वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत जळाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत. महसूल व कृषी विभागाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी वडवली ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वडवली शिवारात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत जळून खाक झाली.
📲Get App