🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

वडछील येथे भजन संध्या व महाप्रसाद थाटात संपन्न

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 16 Nov 2026, 08:15 PM 👁 43
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वडछील येथे भजन संध्या व महाप्रसाद थाटात संपन्न

वडछिल येथे परमार्ग सेवा आश्रमात भजन संध्या व महाप्रसाद थाटात संपन्न
जय श्री कृष्ण महानुभाव परिषद द्वारा संचालित परमार्ग सेवाश्रम वडछिल
शहादा : वडछिल येथील नूतन परमार्ग सेवा आश्रमात दिनांक 15/11/2026 वार रविवार रोजी परिषदेचे नूतन संचालक श्री सुभाष उद्धव पाटील भागापूर यांच्या तर्फे आयोजित भजन संध्या व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला

दुपारी 1 ते 5.30 वाजता महदंबा महिला भजनी मंडळ लोणखेडा या मंडळाची भजन संध्या झाली त्यानंतर सायंकाळी 6 ते 7 वाजता सर्व भक्तांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती रात्री 8.30 ते 11.30 वाजता श्री कृष्ण आत्रेय भजनी मंडळाची भजन संध्या झाली भजनाने संपूर्ण वडछिल परिसर भक्तिमय झाला होता

या कार्यक्रमाला परिसरातील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्वांना दंडवत प्रणाम

वडछिल येथे भजन संध्या व महाप्रसाद थाटात संपन्न
📲Get App