🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापुरात भव्य मोर्चा

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 12 Nov 2026, 06:00 PM 👁 66
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापुरात भव्य मोर्चा
सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल प्रतिटन ३५०० रुपये मिळावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर २०२६) रोजी सोलापुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता चार पुतळा, हुतात्मा चौक येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ३५०० रुपये देण्यात यावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. तसेच ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त द्यावेत आणि साखरेचा दर पुढील वर्षभर ४५ च्या पुढे राहिल्यास पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी २०० रुपये द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
संघटनेने कोल्हापूरमध्ये प्रतिटन ४२०० रुपये, तर कर्नाटकमध्ये ३६०० रुपये दर मिळत असल्याचा उल्लेख करत सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुलनेने कमी दर का मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. साखरेचा दर ३४०० रुपये असताना उसाला ३००० रुपये मिळत होते आणि सध्या साखरेचा दर ५००० रुपये असतानाही उसाला ३००० रुपयेच का, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
'ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही,' असा निर्धार व्यक्त करत संघटनेने शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
📲Get App