🔥 TRENDING बांका के धोरैया प्रखंड में महारुद्र यज... सांवगी बनीं फतेहगढ़ पंचायत समिति की उप... Manipur Forces Destroy 62 Acres of Ill... Manipur CM Discusses Site for New Pher... Patiala Municipal Elections: 30 Wards... ਇੰਟਰ-ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਨਾਕੇ ਦੀ ਅਚਨਚੇਤ ਚੈਕਿੰਗ:...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

उमरीतील आंबेडकर चौक ते मुदखेड रोडवरील वेगवाढीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना धोका

✍️ Reporter: G. P. G. U. .7798377959 🗓 28 Nov 2026, 09:09 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उमरी शहरातील आंबेडकर चौक ते मुदखेड रोडवरील वाहनांचा वेग 80‑90 किमी/ता पर्यंत वाढल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

उमरी शहरातील आंबेडकर चौक ते मुदखेड रोड परिसरात वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. या मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असून, काही वाहने 80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या रस्त्यावर शाळा असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, लहान मुले तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच रस्त्यावर झोपड तेल व इतर साहित्य पसरलेले असल्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी वाहन घसरून अपघात होण्याची भीती असून वाहनांचे नुकसानही होत आहे.

रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्याकडून रस्त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या मार्गावर तातडीने गतिरोधक बसवावेत, रस्त्यावरील चोपट तेल हटवून रस्ता सुरक्षित व व्यवस्थित करावा, तसेच शाळेजवळ वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? की अपघात होण्यापूर्वीच उपाययोजना करण्यात येणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
📲Get App