Lifestyle
उल्हासनगरवासीयांसाठी ऐतिहासिक निर्णय: सिंधी समाजाच्या जमिनी लवकरच 'फ्रीहोल्ड' होणार! मेट्रो, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पाणी योजनेमुळे शहराचा कायापालट होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २३/११/२०२६, नीड २४न्यूज स्पेशल वृत्त
ठाणे, उल्हासनगर :, मुरबाड
उल्हासनगरमधील सिंधी समाजाच्या नागरिकांना त्यांच्या जमिनीचे मालकीहक्काचे पट्टे देऊन त्या जमिनी पूर्णपणे 'फ्रीहोल्ड' करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रक्रियेची सुरुवात नागपूरमधून करण्यात आली असून, लवकरच उल्हासनगरमध्येही ही मोहीम राबवली जाईल आणि त्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट (HSNC) बोर्डाच्या उल्हासनगर येथील सी.एच.एम. महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
मुंबई महानगर प्रदेशासोबत उल्हासनगरचा सर्वांगीण विकास
उल्हासनगरच्या विकासाचा आराखडा मांडताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "उल्हासनगरचा समावेश मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) विकासाच्या व्यापक संकल्पनेत करण्यात आला आहे. शहरात मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम वेगाने सुरू असून, मेट्रोमुळे शहराची कनेक्टिव्हिटी अधिक भक्कम होणार आहे. याशिवाय काँक्रीट रस्ते, नवीन उड्डाणपूल आणि शहरासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याच्या योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी कामांना मान्यता देण्यात आली असून, या कामांना लवकरच गती मिळेल."
तरुणाईला कौशल्याधारित मनुष्यबळात रूपांतरित करण्याची गरज
सध्याच्या बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ विकसित करणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, "देशाला तरुण लोकसंख्येचा मोठा लाभ मिळाला आहे. या तरुणाईला योग्य प्रशिक्षण देऊन कौशल्याधारित मनुष्यबळात रूपांतरित केल्यास भारत स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच संपूर्ण जगालाही कुशल मनुष्यबळ पुरवू शकेल."
सिंधी समाजाच्या संघर्षमय प्रवासाचा आणि 'एचएसएनसी' संस्थेचा गौरव
फाळणीनंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी समाजाच्या जिद्दीचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. "आपली घरे, मालमत्ता आणि व्यवसाय मागे सोडून आलेल्या सिंधी समाजाने शून्यातून नवे आयुष्य उभे केले. केवळ मेहनत, जिद्द आणि उद्यमशीलतेच्या बळावर या समाजाने उद्योग, वैद्यकीय, आर्थिक आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे," अशा शब्दांत त्यांनी समाजाच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला.
तसेच, स्वातंत्र्यानंतर १९४९ मध्ये वांद्रे येथे नॅशनल कॉलेजची स्थापना झाली आणि त्यानंतर 'एचएसएनसी' संस्थेचा विस्तार झाला. आज या संस्थेच्या माध्यमातून सुमारे २७ शैक्षणिक संस्था चालवल्या जात असून, सुमारे १४,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजनिर्मितीच्या उद्देशाने उभारलेल्या या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला लोकप्रिय आमदार किसनजी कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभा गायकवाड, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, विश्वस्त किशू मनसुखानी, अनिल हरीश, माया शहानी, सी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजू लालवाणी पाठक यांच्यासह इतर अनेक मान्यवर, प्राध्यापक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.