🔥 ट्रेंडिंग हेलर इंडस्ट्रीज़ ने गुजरात में स्थापित... अमर उजाला ने पंजाब‑चंडीगढ़ बुलेटिन लॉन... जबलपुर में शंकर जी का आज का दर्शन, सुं... دارم سے گول جانے والی سڑک خستہ حالی کا... ग्राम मोखा में बाल अधिकार जागरूकता एवं... प्रधानमंत्री मोदी ने वैशाली में नीतीश...
21 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जीवनशैली

धसई येथे ‘उमेद’ आणि झाशीची राणी महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होत आहेत : आ. किसनजी कथोरे.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 21 नव. 2026, 06:57 PM 👁 29
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
महिला सक्षमी करण विशेष वृत्त
दिनांक २२/११/२०२६.
मुरबाड (प्रतिनिधी) :
धसई येथे २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मुरबाड आणि झाशीची राणी महिला प्रभाग संघ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. किसनजी कथोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी ग्रामीण भागातील महिलांच्या प्रगतीचे कौतुक केले. महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी ‘उमेद’ आणि प्रभाग संघाच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सभेदरम्यान उपस्थित महिला भगिनींशी थेट संवाद साधून त्यांनी सुरू केलेल्या विविध लघुउद्योगांची, उपक्रमांची आणि वर्षभरातील कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
"महिलांच्या कर्तृत्वाला योग्य संधी, मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाल्यास त्या केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. महिला सक्षमीकरणाची ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे," असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून दिपक पवार, अनिल घरत, धसई सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन परेश मोरे, विठ्ठल ढामसे, संतोष भांगरथ, गोल्हे सर, सुरेश बांगर सर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच झाशीची राणी महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी, विविध महिला बचत गटांच्या अध्यक्षा, बचत गट कमिटी सदस्य, ‘उमेद’चे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
📲Get App