🔥 TRENDING Manipur Governor Inaugurates New Healt... Manipur High Court Declares Producing... Meghalaya Launches Digital Transport S... सीओ शाहाबाद देवकीनंदन ने किया थाना सैफ... Meghalaya Transfers Baljek Airport to... Meghalaya Cabinet Chooses Long‑Term Bo...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

दुष्काळाचे सावट असताना नीरा उजव्या कालव्याला गळती; लाखो लिटर पाणी वाया! पाण्याचा अपव्यय रोखण्यात पाटबंधारे विभाग अपयशी? शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान व शेती नपिक होण्याची भीती

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 19 Nov 2026, 03:10 PM 👁 59
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर, पुणे :
राज्यभर दुष्काळाचे सावट निर्माण झालेले असताना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, एकीकडे पाण्याची टंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे चित्र नीरा उजव्या कालव्याच्या गळतीमुळे समोर येत आहे.
नीरा उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. त्यामुळे कालव्याला ठिकठिकाणी गळती लागली असून, लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कालव्यातून वाहणारे पाणी केवळ शेतकऱ्यांच्या शेतातच नव्हे, तर रस्त्यावरही वाहून जात असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे कालव्याच्या गळतीमुळे उपलब्ध पाणी वाया जात आहे. या गळतीचा फटका कालव्यालगतच्या त्यांच्या शेतातील भात पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबरोबर शेतामध्ये हे पाणी साचून राहत असल्यानं शेकडो एकर शेती नापीक होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत.पाठबंधारे विभागाने कालव्याचे सिमेंट काँक्रीटीकरणं करून अस्तरीकरणं करावे आणि गळती थांबवावी अशी मागणी शेतकरी करतायत. कालव्याच्या अस्तरीकरणाची कामे रखडलेली असताना पाटबंधारे विभागाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे का? पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना कालव्यामधून होणारी गळती रोखण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची नाही का? असा सवाल नागरिक आणि शेतकरी उपस्थित करत आहेत.

पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्याची पाहणी करून गळती रोखावी, रखडलेली अस्तरीकरणाची कामे पूर्ण करावीत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

आता या गंभीर प्रकाराची पाटबंधारे विभाग किती गांभीर्याने दखल घेणार आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कोणती ठोस कारवाई करणार, याकडे भोर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
📲Get App