🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्याने फाडले बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, चंद्रपुरात निषेध आंदोलन

✍️ Reporter: Jitendra Govinda Ade 🗓 19 Nov 2026, 05:17 PM 👁 42
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून अपमान केला, ज्यामुळे चंद्रपुरात आक्रमक निषेध आंदोलन झाले.

शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी फोटो फाडून त्यांचा घोर अपमान केल्याच्या संतापजनक घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.

बाळासाहेबांच्या अस्मितेवर झालेल्या या आघाताविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर आक्रमक पवित्रा घेत निषेध आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपुरात युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना युवासेना सचिव वरून सरदेसाई साहेब युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल दादा काकडे युवांसेना महाराष्ट्र राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले.

मुंबईत आयोजित शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेत शायना एनसी यांनी सर्वांसमोर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचा आणि आमच्या दैवताचा अवमान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्या बाळासाहेबांच्या नावावर हे सत्ता आणि राजकारण उपभोगत आहेत, त्याच बाळासाहेबांचा असा जाहीर अपमान करणाऱ्या गटातील प्रवक्त्याला लाज वाटली पाहिजे, असा घणाघाती हल्लाबोल विक्रांत सहारे यांनी केला.

बाळासाहेबांचा हा अवमान कदापि सहन केला जाणार नाही; शायना एनसी यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशाराही सहारे यांनी दिला. आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला तीव्र संताप व निषेध व्यक्त केला.
📲Get App