🔥 ट्रेंडिंग સુરતની ડૉ. પારુલ વડગામા: 18 વર્ષથી TB... સાબરકાંઠા જિલ્લાના ગામોમાં સીસીટીવી સ્... ठाणे जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून व... जेल से निकलते ही आज़म खान ने किया घोषण... मणिपुर के गवर्नर ने चुराचंदपुर में नई... मणिपुर उच्च न्यायालय ने 24 घंटे के बाद...
19 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

शिरोशी ग्रामपंचायतीतील १४ लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी निलंबित; सरपंचांच्या कारभाराचीही होणार चौकशी

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 19 नव. 2026, 03:00 PM 👁 37
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक २०/११/२०२६
विशेष वार्ता पत्र
ठाणे जिल्हा, तालुका मुरबाड (प्रतिनिधी) :
मुरबाड तालुक्यातील शिरोशी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण घायवट यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा मुकणे यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १७) दिले आहेत. प्रशासनाच्या या ठोस कारवाईनंतर उपसरपंच शेखर देशमुख यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे.
नेमके प्रकरण काय?
शिरोशी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण घायवट यांनी पदाचा गैरवापर करून विविध प्रकारचे गैरव्यवहार केल्याचा आरोप उपसरपंच शेखर देशमुख यांनी केला होता. सरपंच शोभा मुकणे आणि ग्रामविकास अधिकारी घायवट यांनी संगनमत करून ग्रामपंचायतीच्या निधीत तब्बल १४ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर दावा देशमुख यांनी आपल्या तक्रारीत केला होता.
उपोषणानंतर प्रशासनाला जाग
या भ्रष्टाचाराविरोधात आणि सरपंच मुकणे यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी उपसरपंच शेखर देशमुख यांनी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
उपसरपंचांच्या या आंदोलनाची जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण घायवट यांच्या निलंबनाचे आदेश काढले आणि सरपंचांच्या कारभाराची चौकशी सुरू केली. न्याय मिळाल्याने आणि प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलल्याने शेखर देशमुख यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. या कारवाईमुळे मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
📲Get App