🔥 TRENDING PM Modi to Inaugurate 9.76‑km Nitiś Se... Cold North Winds Cut Indore Temperatur... Tamil Song 'Varuvaaiy' Nominated for G... India Notices Global Surge in New Free... Petrol and Diesel Prices Remain Unchan... Cyclone Akvan Expected to Impact Chenn...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

श्री महालक्ष्मी माता मंदिरात भजनोत्सव (मिनी दंगल) उत्साहात संपन्न

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 19 Oct 2026, 12:54 AM 👁 166
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मल्लाव समाजाचे अध्यक्ष श्री. अविनाशजी हरिभाऊ मल्लाव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

श्री महालक्ष्मी माता मंदिरात भजनोत्सव (मिनी दंगल) उत्साहात संपन्न

शिरूर | पुणे जिल्हा प्रतिनिधी | १८ ऑक्टोबर २०२६

शिरूर शहरातील काची आळी येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरात भजनोत्सव (मिनी दंगल) कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मल्लाव समाजाचे अध्यक्ष श्री. अविनाशजी हरिभाऊ मल्लाव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी शिरूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका श्रीमती संगीता महेंद्र मल्लाव, युवा उद्योजक श्री. शंतनू भैया महेंद्र मल्लाव, भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल दिवाणजी मल्लाव तसेच शिरूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री. रवींद्र उर्फ शाम मनोहर ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात विविध मल्लाव समाजांच्या वतीने सहभागी झालेल्या मानकरींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मंगळवार पेठ मल्लाव समाजाचे श्री. राजेश दामोदर काची, नदीपार मल्लाव समाज, संगमवाडीचे श्री. दिलीप भगत, घोडनदी मल्लाव समाजाचे श्री. रामचंद्र दगडोबा चौधरी आणि भिवरथडी मल्लाव समाज, पिंपरी-सांडसचे श्री. ज्ञानेश्वर कसुरे यांचा समावेश होता. हा सत्कार श्री. रवींद्र उर्फ शाम मनोहर ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

भजनोत्सवासाठी मंगळवार पेठ, नदीपार-संगमवाडी, भिवरथडी-पिंपरी सांडस आणि घोडनदी-शिरूर येथील मानाच्या ढोलक्या उपस्थित होत्या. कासरवाडी मल्लाव समाजाची ढोलकी काही कारणास्तव उपस्थित राहू शकली नसल्याने श्री. दिगंबर भगत यांनी उपस्थिती दर्शवली.

आरतीनंतर पारंपरिक जसबाजीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नदीपार मल्लाव समाज, संगमवाडीचे श्री. विजय विठ्ठलराव काची तसेच श्री. दिगंबर नारायण मल्लाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आमचे मोठे बंधू श्री. घनश्याम बिट्टू कनिच्छे पाटील यांचीही उपस्थिती.

कार्यक्रमास मल्लाव समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आयोजक समस्त कसुरे आणि परिवार
📲Get App