🔥 TRENDING IMD Detects New Cyclonic Circulation F... Youth Caught Stealing Key of Odisha’s... Sick Youth Dies on Bike While Heading... Kartik Aaryan Reveals His Luxury Garag... Ramayana grosses Rs 660 crore in Hindi... ગોધર (મહીસાગર)માં શિક્ષક સંમેલનમાં ડૉ....
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

शहादा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे.

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 22 Nov 2026, 02:54 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहादा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे.

नमस्कार मी अशोक पाटील, शहादा दर्पण न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत.

शहादा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे.

शहादा दिनांक-21 तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा.ली. युनिट नंबर -9 च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त मोठा दिलासा देण्यात आला आहे. जाहिर केल्याप्रमाणे प्रतिटन 200 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले असून कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचा शुभारंभीही करण्यात आला.
दिवाळी सणानिमित्तकारखांने यापूर्वी प्रतिटन देण्याचे जाहीर केले होते तसेच परिसरातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता गाळप हंगाम उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी अधिकचे 100 रुपये देण्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळत चेअरमन बोत्रे पाटील यांनी एकूण प्रतिटन 200 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. यामुळे मागील हंगामातील 2850 रुपये आणि आत्ताच 200 रुपये असे मिळून शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण 3050 रुपये दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिला हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान,दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पुरुषोत्तम नगर साईट येथे शहादा तालुका तहसीलदार संभाजी पाटील, दीपकबापू पाटील युनिट हेड अशोक पाटील आणि खेड दिगरचे ग्रामहसूल अधिकारी लक्ष्मण कोळी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत बळी राजाच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याची भूमिका ओंकार शुगर व्यवस्थापनाने घेतली आहे. यंदाचा हंगामातही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कारखान्याला ऊस पुरवठा करावा असे आवाहन ओंकार ग्रुप चे बाबुराव बोत्रे पाटील यांनी केली आहे.
📲Get App