🔥 TRENDING कार्तिक मेले में श्रद्धालुओं से Need 2... Drishti IAS Releases Daily Madhya Prad... बिहार में दवा दुकानों पर औषधि नियंत्रण... Sidhu Moosewala’s Father Balkaur Singh... रिम्स जमीन घोटाले में ACB की बड़ी कार्... Congress moves Constitution Protection...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

शुभेच्छा

✍️ Reporter: Kantilal Shivram Kasabale 🗓 14 Nov 2026, 01:40 PM 👁 73
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सामाजिक कार्याची दखल! सौ. आरोही आप्पाजी दळवी यांची राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कारासाठी निवड

तळा (रायगड) : तालुक्यातील भानंग ग्रामपंचायत हद्दीतील पाचघर गावासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. आरोही आप्पाजी दळवी यांची महाराष्ट्र ग्रामविकास परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार सोहळा २०२६ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी योगदान देणाऱ्या सौ. आरोही दळवी यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पाचघर गावासह भानंग ग्रामपंचायत आणि तळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या पुरस्काराचा सन्मान सोहळा रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रण त्यांना देण्यात आले आहे.

सौ. आरोही आप्पाजी दळवी यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

पाचघर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा! सामाजिक कार्याचा सन्मान, गावासाठी अभिमान!
📲Get App