🔥 TRENDING Gokul Dairy Raises Milk Price by ₹6, B... India Faces Ongoing Drought Conditions... Samantha, Raj Nidimoru Welcome Baby Bo... UP Woman Dies 8 Months After Marriage;... Thieves Leap Over Wall, Enter Through... Defence Minister Inaugurates Chungthan...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

स्वेरीमध्ये ‘व्हीएलएसआय डिझाइन पद्धती आणि नोकरीच्या संधी' यावर कार्यशाळा संपन्न

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 09 Nov 2026, 07:13 PM 👁 200
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गोपाळपूर (ता. पंढरपुर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे विद्यार्थ्यांना व्हीएलएसआय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगातील कार्यपद्धती आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘व्हीएलएसआय डिझाइन पद्धती आणि नोकरीच्या संधी' या विषयावर दोन दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे विद्यार्थ्यांना व्हीएलएसआय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगातील कार्यपद्धती आणि रोजगाराच्या संधींची माहिती मिळावी या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘व्हीएलएसआय डिझाइन पद्धती आणि नोकरीच्या संधी' या विषयावर दोन दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवलकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी व्हीएलएसआय डिझाइन पद्धती तसेच व्हीएलएसआय क्षेत्रातील सध्याचे ट्रेंड, उद्योगांच्या गरजा आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या विविध संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना व्हीएलएसआय उद्योगातील कौशल्यांची आवश्यकता, एएसआयसी डिझाइन, आधुनिक अर्धवाहक उद्योग आणि करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. या दोन दिवसात चीफ एज टेक्नॉलॉजीज या कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ.राजेश एस. नारायण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॉर्ज के.अब्राहम, फ्लिंट टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तमिलार्सन एन., डॉ.चंद्रशेखर पाटील आदी तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक व करिअरविषयक प्रश्न विचारून तज्ज्ञांशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी एएसआयसी डिझाइन अंमलबजावणी – आरटीएल-टू-जीडीएस या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व इंटरॅक्टिव्ह तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या एएसआयसी डिझाइन प्रवाहची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. आरटीएल डिझाइन पासून सुरुवात करून सिंथेसीस, डिझाइन अंमलबजावणी आणि जीडीएस–दोन निर्मिती पर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आली. प्रत्यक्ष तांत्रिक सत्रांमुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न मिळता उद्योग-अभिमुख व्हीएलएसआय डिझाइन प्रवाह समजून घेण्याची आणि प्रत्यक्ष कामकाजाची अनुभूती मिळाली. विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, प्रयोगशाळा प्रमुख व संस्थेच्या नेतृत्व टीमसोबत आढावा, चर्चा आणि पुढील कृती यावर चर्चा करण्यात आली. या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना व्हीएलएसआय, एएसआयसी डिझाइन, आरटीएल-टू-जीडीएस फ्लो आणि सेमीकंडक्टर उद्योग मधील करिअरच्या संधी याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. आधुनिक व्हीएलएसआय तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरला. स्वेरीचे प्राध्यापकवर्ग तसेच सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
📲Get App