🔥 TRENDING 23 States Applaud Chhattisgarh’s Smart... Chandigarh Conducts Mock Blackout Dril... Punjab Farmers Turn Crop Waste into In... Gurnoor Brar: Punjab’s 6ft 5in Pace St... Assam to Build New Airport Near Silcha... Assam Rifles Leads Arunachal Girls on...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्राचार्य पदी प्रा. अमेय भातलवंडे

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 27 Nov 2026, 08:30 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्राचार्य पदी प्रा. अमेय भातलवंडे पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) च्या प्राचार्यपदी प्रा. अमेय सतिशराव भातलवंडे यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे प्राचार्य प्रा. अमेय भातलवंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्राचार्य पदी प्रा. अमेय भातलवंडे
पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) च्या प्राचार्यपदी प्रा. अमेय सतिशराव भातलवंडे यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे प्राचार्य प्रा. अमेय भातलवंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विद्यार्थी प्रिय शिक्षक असलेले प्रा. अमेय भातलवंडे यांचे प्राथमिक शिक्षण धाराशिव मधील श्रीपतराव भोसले प्रशालेत झाले. दहावीला उत्तम यश संपादन केल्यामुळे सोलापुरातील चंडक महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातून डिप्लोमाचे शिक्षण घेतले. पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देखील त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागातून यशस्वीपणे पूर्ण केले. २०१४ साली ते स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. शिक्षणाची आवड तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच सर्वांगीण विकास साधण्याकडे बारीक लक्ष देवून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी वाढविण्याचे काम केले. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून २०१८ साली प्रा. भातलवंडे यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुखाची जबाबदारी सोपवली गेली. तेथून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष परिश्रम घेणे सुरु केले. त्यानंतर इन्फर्मेशन टेक्नोलॉजी या विभागाचे विभागप्रमुख पद त्यांना बहाल केले गेले. पद कोणतेही मिळो हुरळून न जाता आपले काम साध्य करणे हाच उद्देश ठेवून प्रा. भातलवंडे यांनी शिक्षणाचे कार्य सुरु ठेवले. दरम्यान ज्ञानदान करत असतानाच त्यांनी १४ आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये शोध पेपर प्रसिद्ध केले आहेत. सध्या त्यांचा पीएच.डी.चा अभ्यास सुरु आहे. दरम्यानच्या काळात स्वेरीसाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया असो, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) असो, आंतरराष्ट्रीय दर्जाचे एनबीए मानांकन प्रक्रिया असो किंवा सोपविलेली कोणतीही जबाबदारी असो, प्रत्येक कार्यात भव्य योगदान देण्याचे काम प्रा. भातलवंडे यांनी केले. एकूणच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे प्रभावी कार्य, विद्यार्थ्यांची प्रगती आणि कार्यातील एकाग्रता पाहून स्वेरी व्यवस्थापनाने त्यांच्या गळ्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा) च्या प्राचार्य पदाची माळ टाकण्याचा निर्णय घेतला व दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रा. अमेय भातलवंडे यांची प्राचार्यपदी निवड केली. त्या अनुषंगाने व्यवस्थापनाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य प्रा. भातलवंडे म्हणाले की, ‘व्यवस्थापनाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीन. यासाठी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या विश्वासास पात्र राहून माझे शैक्षणिक कार्य अविरतपणे सुरू राहील.’ अशी ग्वाही दिली. त्यांची प्राचार्यपदी निवड झाल्यामुळे संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे माजी प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
📲Get App