🔥 TRENDING SGPC ਪ੍ਰਧਾਨ ਹਰਜਿੰਦਰ ਧਾਮੀ ਦੀ ਮੰਗ, ਕਰਤਾਰ... એક તરફ નાગરિકો ગટર અને ગંદા પાણીની ગંભ... गुमशुदा मनीष कुमार झा सकुशल घर लौटे, अ... Gold ''ਚ ਮਿਲਾਵਟ ਕਾਰਨ ਮਚਿਆ ਹੜਕੰਪ, Hallm... রাজ্যে ১০,১৪৬টি পদে নিয়োগের প্রস্তাবে... ਵੱਡੀ ਖ਼ਬਰ: ਜੈਨਸਨ ਹੁਆਂਗ ਦੀ NVIDIA ''ਚ ਵ...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सावंगा जहांगिर गावाला स्वातंत्र डीपी विद्युत पुरवठा नाहीतर टॅंकरने पाणी देण्यात यावे मा.कार्यकारी अभियंता वाशिम विभाग यांना निवेदन.

✍️ Reporter: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 23 Nov 2026, 10:01 PM 👁 27
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सावंगा जहांगिर गावाला स्वातंत्र डीपी विद्युत पुरवठा नाहीतर टॅंकरने पाणी देण्यात यावे मा.कार्यकारी अभियंता वाशिम विभाग यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:आज वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहांगिर गावाला तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा. या साठी आज रोजी वाशिम येथे जाऊन गावकऱ्यांनी मा.कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागवाशिम यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सांगितले की सावंगा जहांगिर या गावाला जल जीवन मिशन योजने मार्फत गावासाठी विहीर खोदण्यात आली असून तिला भरपूर प्रमाणात पाणी लागले असून. पाईप लाइन गावांपर्यंत करण्यात आली टाकी बांधण्यात आली टाकी च काम पूर्ण झाले या योजने मार्फत घरोघरी नळ देण्यात आले. पण पाणी गावा पर्यंत येण्यासाठी फक्त विज्कनेक्शन नाही व स्वतंत्र डीपी नाही या मुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना खूप दूर जावे लागत आहे पाणी आणण्यासाठी त्यातचउन्हातानात स्त्रियांनाया गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे.तात्काळ विद्युत पुरवठा देण्यात यावा.नवीन कनेक्षण. स्वतंत्र डीपी देण्यात यावी नेहमीच सुरळीत पाणीपुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र वीज द्यावी तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा पुरवण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली असून. गावकरी पाण्याच्या टाकी असून चालू कधी होणार या विचारात आहेत. मा. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग वाशिम या वेळी निवेदन देण्यासाठी. अखिल भारतीय विकास विद्यार्थी परिषदचे श्रीकृष्ण भाऊ चोंडकर व प्रवीण भाऊ खिल्लारे दीपक आगलावे यशवंत गायकवाड व रामेश्वर गोदमले हे सर्वगावकरी निवेदन देण्यासाठी आले होते
📲Get App