🔥 ट्रेंडिंग સબ ડિસ્ટ્રિક હોસ્પિટલ ઝાલોદમાં વિશ્વ એ... श्री नीरज गुप्ता सीनियर नेता बीजेपी सम... ट्रंप, शी और पुतिन ने जारी किया 'शांति... नागालैंड डियर लॉटरी के परिणाम 20 नवम्ब... नागालैंड के JHADC की शीतकालीन सत्र शुर... मणिपुर में डिजिटल प्लेटफ़ॉर्म Digi‑SAP...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
खेल

सातासमुद्रापार खडवलीच्या लेकीचा डंका! जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्रतीभा लोणे हिला कांस्यपदक; जगात पटकावला आठवा क्रमांक

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 20 नव. 2026, 01:19 PM 👁 36
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४न्यूज महाराष्ट्र
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २०/११/२०२६.
खेळ विशेष वृत्त =
कल्याण / मुरबाड :
जिद्द, चिकाटी आणि अफाट मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडूही जागतिक पातळीवर आपली मोहोर उमटवू शकतात, हे खडवलीच्या सुकन्या प्रतीभा अरुण लोणे हिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तुर्की येथील इस्तंबूल शहरात पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘वर्ल्ड ओपन इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ (World Open Equipped Powerlifting Championship) स्पर्धेत प्रतीभाने भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा तिरंगा सातासमुद्रापार अभिमानाने फडकला असून कल्याण, मुरबाडसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याची मान उंचावली आहे.
असा रंगला थरारक सामना आणि कामगिरीचा आलेख:
या जागतिक स्पर्धेत जगभरातील अनेक बलाढ्य आणि दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महिलांच्या खुल्या ८४ किलो वजनी गटात उतरलेल्या प्रतीभाने सुरुवातीपासूनच आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले.
• स्क्वॉट (Squat): या प्रकारात तिने अविश्वसनीय ताकदीचे प्रदर्शन करत तब्बल २४२.५ किलो वजन यशस्वीरित्या उचलले आणि तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
• बेंच प्रेस (Bench Press): दुसऱ्या टप्प्यात तिने १०० किलो वजन उचलत आपली आघाडी कायम ठेवली.
• डेडलिफ्ट (Deadlift): अंतिम टप्प्यात तिने १९० किलो वजनाची यशस्वी उचल केली.
अशाप्रकारे तिन्ही प्रकारांत मिळून तिने एकूण ५३२.५ किलो वजनाची नोंद करत जागतिक क्रमवारीत आपल्या वजनी गटात आठवा क्रमांक पटकावण्याची किमया साधली आहे.
कल्याण-मुरबाड परिसरात आनंदाचे वातावरण:
खडवलीसारख्या भागातून कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रतीभाने हा प्रवास पूर्ण केला आहे. तिचे वडील अरुण लोणे आणि कुटुंबीयांनी दिलेली खंबीर साथ, तसेच प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रतीभाच्या या नेत्रदीपक यशानंतर कल्याण, मुरबाड तालुका आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.
📲Get App