🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

सोमटणे: ४० नागरिकांनी लाभ घेतला भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 17 Nov 2026, 11:51 AM 👁 62
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी सोमटणे येथे भारतीय महाक्रांती सेना आरोग्य विभाग, अष्टविनायक फाउंडेशन व इतर भागीदारांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले, ज्यात ४० नागरिकांनी रक्तदाब, रक्तातील साखर, ECG व क्षयरोग जनजागृतीसह विविध सेवा घेतल्या.

१४ नोव्हेंबर २०२६ रोजी सोमटणे येथील कसळखंड ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय महाक्रांती सेना आरोग्य विभाग, अष्टविनायक फाउंडेशन, अष्टविनायक हॉस्पिटल (मोहपाडा, रसायनी), रायगड जिल्हा क्षयरोग केंद्र व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ४० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.

शिबिरात रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ECG, डॉक्टरांचा सल्ला, क्षयरोगाबाबत जनजागृती तसेच विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी अष्टविनायक हॉस्पिटल, मोहपाडा (रसायनी) येथे संदर्भित करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत मेस्त्री (MJPJAY विभाग, MOD – Manager On Duty) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासमवेत डॉ. ओमकार निकम, स्टाफ नर्स राधिका, विशाखा शिगवण तसेच सहाय्यक अशोक उगलमुगले व आरोग्य सेवक श्री.संकेत सागवेकर यांनी रुग्ण तपासणी व व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.

तसेच उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी श्रीम. तेजस्वी पवार, क्षयरोग पर्यवेक्षक श्री समीर वाशीकर व आशा सेविका शुभांगी पाटील, जयश्री भोपी, नयना गायकर आणि ग्रामपंचायत कार्यालय यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उल्लेखनीय सहकार्य केले. त्यांच्या समन्वयामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व आजारांचे वेळेत निदान करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. उपस्थित नागरिकांनी आयोजक संस्थांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशी शिबिरे सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा भारतीय महाक्रांती सेना यांच्या कडे व्यक्त केली.
📲Get App