🔥 TRENDING बालमटाकळी गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा... सुरक्षित आहार, हमर अधिकार अभियान: गौरे... ବାତ୍ୟାକୁ ନେଇ ହାଇଆଲର୍ଟରେ ଭୁବନେଶ୍ୱର ଏୟାର... कलेक्टर विजय दयाराम ने 44 प्रतिभागियों... ବାତ୍ୟା ପୂର୍ବରୁ ପୁରୀରେ ଜୋରଦାର ପ୍ରସ୍ତୁତି... कल्याणपुरा ब्लॉक नंबर 2 में खिला कमल,...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सोलापुरात १४ नोव्हेंबर रोजी ‘स्नेहा गौरी लाईव्ह ऑर्केस्ट्रा’चे आयोजन

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 12 Nov 2026, 11:54 AM 👁 70
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सोलापुरात १४ नोव्हेंबर रोजी ‘स्नेहा गौरी लाईव्ह ऑर्केस्ट्रा’चे आयोजन
सोलापूर : संगीतप्रेमी रसिकांसाठी सोलापुरात ‘स्नेहा गौरी लाईव्ह ऑर्केस्ट्रा’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार डॉ. जब्बार यांच्या ‘स्टार्स ऑफ मेलोडीज’सह प्रभाकर सलगर आणि राजू गायकवाड प्रस्तुत या कार्यक्रमात सुरेल गीतांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमात जुन्या व नव्या लोकप्रिय गीतांसह सुरेल संगीताची मैफल रंगणार असून, संगीतप्रेमी प्रेक्षकांसाठी जल्लोषपूर्ण आणि मनोरंजक कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे.
‘तुने ही सजाये है मेरे होठों पे ये गीत’ या सुरेल गीताच्या भावनेतून सजणाऱ्या या संगीत संध्येत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
📲Get App