🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सोलापुरात १८ नोव्हेंबर रोजी मोफत बालरोग आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम; १ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मिळणार मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 13 Nov 2026, 08:43 AM 👁 84
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सोलापुरात १८ नोव्हेंबर रोजी मोफत बालरोग आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर
एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम; १ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मिळणार मोफत आरोग्य तपासणीचा लाभ
सोलापूर : मुलांचे आरोग्य, योग्य शारीरिक वाढ आणि निरोगी भविष्य लक्षात घेऊन एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर यांच्या वतीने बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मोफत बालरोग आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या परिसरात आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये १ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना मोफत बालरोग तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन मिळणार आहे. यामध्ये मुलांची उंची, वजन, शारीरिक वाढ आणि आरोग्यविषयक स्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आहार, पोषण, रक्तक्षय (अॅनिमिया), लसीकरण आणि किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
लहान मुलांना वारंवार सर्दी, खोकला, ताप येणे, दमा, श्वसनाचे विकार, पोटदुखी, बद्धकोष्ठता, पचनाचे विकार, भूक कमी लागणे, वजन न वाढणे, रक्तक्षय, पोषणविषयक समस्या तसेच अपस्मार (फिट्स) यांसारख्या तक्रारी असल्यास पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय वारंवार होणारे संसर्गजन्य आजार, लहान मुलांमधील वाढ व विकासाच्या समस्या आणि किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्याशी संबंधित अडचणींबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळेवर तपासणी करून घ्यावी आणि त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. निरोगी बालपणातूनच उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
शिबिरासंबंधी अधिक माहिती व नोंदणीसाठी पालकांनी ०२१७-२३११२०१ किंवा +९१ ९४०५३ ३०६८३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
आपल्या मुलांचे आरोग्य हीच खरी संपत्ती! वेळेवर तपासणी करा आणि निरोगी भविष्य घडवा!
📲Get App