सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाची निवड बिनविरोध; 10 संचालकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब
Watch on:
▶️ YouTube
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या संचालकपदाच्या निवडणुकीत 10 संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. निवडणुकीत संबंधित उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वावर आणि सहकार क्षेत्रातील कार्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
संचालकपदी बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजा भाऊ राऊत, प्रशांत (मालक) परिचारक, बालकृष्ण पाटील, अजिंक्यराणा पाटील, पृथ्वीराज माने, सिद्धेश्वर अवताडे, रायतन शिंदे, श्रीपाद हसापूर आणि संभाजी जगताप यांचा समावेश आहे.
या बिनविरोध निवडीमुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात नव्या नेतृत्वाला संधी मिळाली असून, जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संचालक एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकरी, सहकारी संस्था, सभासद आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी बँकेच्या माध्यमातून प्रभावी कार्य होईल, अशी आशा सहकार क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
सर्व नवनिर्वाचित संचालकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सहकार क्षेत्रात विश्वासाचा विजय... नेतृत्वावर शिक्कामोर्तब!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेल्या सर्व संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉