🔥 TRENDING Himachal Pradesh Legislative Assembly... Governor Opens Winter Travel Exhibitio... Yogi Adityanath's Mother Passes Away a... Chief Minister to Depart for Uttarakha... 27-Year-Old Arrested After Impersonati... Bulgarian Foreign Minister Velislava P...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

सह्याद्रीच्या कुशीतील मुरबाड शहरात मनसेची 'किल्ले सजावट स्पर्धा' उत्साहात; बालमावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 12 Nov 2026, 12:59 PM 👁 352
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सह्याद्रीच्या कुशीतील मुरबाड शहरात मनसेची 'किल्ले सजावट स्पर्धा' उत्साहात; बालमावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
दिनांक १२/११/२०२६.
मुरबाड: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरबाड शहरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मुरबाड शहरातील लहान-मोठ्या मुलांनी दिवाळीनिमित्त आपल्या घरासमोर विविध प्रकारचे किल्ले मोठ्या आवडीने आणि मेहनतीने साकारले होते. या बालमावळ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याची प्रेरणा रुजावी, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मुरबाड शहराच्या वतीने 'किल्ले सजावट स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते.
मुरबाड शहरातील विविध भागांतील अनेक मुलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये खालील बालमावळ्यांचा समावेश होता:
१. आरुन गजानन चंदे (संत रोहिदास नगर, मुरबाड)
२. तन्मय रवी भोईर (आंबेडकर नगर, मुरबाड)
३. ओमकार अनंत गोंधळी (तोंडलीकर नगर, मुरबाड)
४. विवेक तुकाराम डोंगरे (शास्त्रीनगर, दुधाळ पाडा)
५. नयन राजेश डोंगरे (शास्त्रीनगर, दुधाळ पाडा)
६. जय तानाजी तरे (शास्त्रीनगर, दुधाळ पाडा)
७. सुरज हेमंत गोंधळी (शास्त्रीनगर, दुधाळ पाडा)
८. ओमकार अनिल खाटेघरे (शास्त्रीनगर, दुधाळ पाडा)
९. दिव्यांशू हेमंत चौधरी
या उपक्रमाबाबत बोलताना मनसे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव म्हणाले की, "मुरबाड शहराला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. आजच्या लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांची माहिती आणि स्वराज्याची प्रेरणा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. या स्पर्धेमुळे मुलांना आपल्या इतिहासाची ओळख होईल. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी मनसे मुरबाड शहर प्रयत्नशील राहील."
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मनसेचे वॉर्ड क्रमांक १७ चे शाखाप्रमुख भरत कराळे आणि शहर प्रमुख कीर्ती गोहील यांनी विशेष परिश्रम घेतले. मुलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम संपूर्ण मुरबाड शहरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
📲Get App