🔥 TRENDING Tamil Director Vetrimaaran Faces Criti... Njodi Film Shooting Completed; Hashir’... Manipur Governor Urges Preservation of... Manipur Aims to End Child Marriages by... Manipur Assembly Elections May Be Post... Meghalaya CM Sets 8‑Month Deadline for...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

रायरी येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 13 Nov 2026, 06:54 PM 👁 96
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर - रायरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प रथ देऊन व रांगोळी काढून भव्य स्वागत करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायरी ता भोर येथे पुणे जिल्हा परिषदेच्या विशेष उपक्रमांतर्गत दिवाळी पाडव्या निमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक हरी महांगरे यांनी सर्वांची स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माजी सरपंच सूर्यकांत किंद्रे होते.यावेळी उपसरपंच संदीप किंद्रे,तंटामुक्तीचे अध्यक्ष किसन किंद्रे,मुख्याध्यापक हरी महांगरे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पवार गोरक्षनाथ डेरे,शंकर लक्ष्मण किंद्रे,नितीन किंद्रे विश्वनाथ किंद्रे विजय किंद्रे,युवराज साबळे,राहुल किंद्रे,मंगेश किंद्रे,अमोल किंद्रे व माजी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी माजी सरपंच सूर्यकांत किंद्रे यांनी शाळेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात शाळेच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किसन किंद्रे यांनी सांगितले हे समोर बसलेले सर्व आमच्या गावचे हिरे आहेत.त्यांनी गावाचे नाव उज्वल केले असून इतरांनी त्यांचा आदर्श घेऊन गावचे नाव पुढे न्यावे यावेळी गोरक्षनाथ डेरे.विश्वनाथ किंद्रे नितीन किंद्रे तेजस किंद्रे,युवराज साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या तेजस किंद्रे तसेच मुंबई कारागृह पोलीस म्हणून निवड झालेल्या राहुल किंद्रे यांचा तसेच शाळेचे मुख्याध्यापक हरी महांगरे यांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रामचंद्र पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने व शिक्षण विस्तार अधिकारी अंजना वाडकर, केंद्रप्रमुख श्री दोडमिसे यांचे मार्गदर्शन मिळाले.
📲Get App