🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

राजसाहेब ठाकरे यांची देवेंद्र जाधव यांच्याशी सदिच्छा भेट; कामाचे केले कौतुक .

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 11 Nov 2026, 04:47 PM 👁 103
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
दिनांक: ११/११/२०२६
मुरबाड विशेष वृत्त
जिल्हा प्रतिनिधी: काशिनाथ देसले (ठाणे)
सह तालुका प्रतिनिधी: किशोर पवार (मुरबाड)

मुरबाड : राजसाहेब ठाकरे यांची देवेंद्र जाधव यांच्याशी सदिच्छा भेट; कामाचे केले कौतुक

मुरबाड : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे मुरबाड शहर अध्यक्ष श्री. देवेंद्र जाधव यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान मुरबाड विधानसभा मतदारसंघातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, सध्या सुरू असलेली विविध विकासकामे आणि आगामी राजकीय वाटचाल याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
यावेळी राजसाहेब ठाकरे यांनी देवेंद्र जाधव यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. "चांगलं काम करत आहात, असंच काम सुरू ठेवा!" अशा शब्दांत त्यांनी जाधव यांना प्रोत्साहन दिले.
पक्षप्रमुखांकडून मिळालेल्या या शाबासकीमुळे देवेंद्र जाधव यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. आगामी काळात मुरबाडच्या जनतेच्या प्रश्नांसाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते अधिक जोमाने कार्यरत राहणार आहेत.
📲Get App