🔥 TRENDING पटवारी के बीच टकराव के माहौल में 38 दि... ધાંગધ્રાબ્રહ્મા સમાજની કંડક્ટર દીકરી ત... અમદાવાદમાં ONGCની 8000 લિટર કાચા તેલની... Pakistan Minister Makes Rare India Vis... Clarion India Raises Question: Does In... Salman Khan's 'Maatrubhumi' drops high...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

रोहित पठारे हत्याकांड: द रिअल पँथर ऑफ इंडिया ने दिले तीव्र जनआंदोलनाचा इशारा

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 10 Nov 2026, 04:21 PM 👁 98
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वैजापूर येथील रोहित अनिल पठारे यांच्यावर झालेल्या हत्याकांडावर द रिअल पँथर ऑफ इंडिया ने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन दिले आणि तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला.

प्रतिनिधी :- रोहित अनिल पठारे यांच्यावर वैजापूरमध्ये झालेल्या अमानुष व क्रूर हल्ल्यामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या दिवशी स्थानिक पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणावर आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नावर द रिअल पँथर ऑफ इंडिया ने आक्रमक पवित्रा घेतला आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदनाद्वारे दाद मागत पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संघटनेने मयत रोहित पठारे यांचा निष्पाप भाऊ तुषार अनिल पठारे याचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळण्याची, निःपक्षपाती तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याची, कर्तव्यचुकार पोलीस निरीक्षक व संबंधित पोलिसांवर सहआरोपी म्हणून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, पीडित कुटुंबाला ₹५० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्याची आणि खटल्याचे कामकाज जलद गतीने न्यायालयात चालवण्याची मागणी केली. तसेच मुख्य फिर्यादी शितल पठारे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला २४ तास सशस्त्र पोलीस संरक्षण पुरवण्याची विनंती करण्यात आली.

प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास संपूर्ण छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा द रिअल पँथर ऑफ इंडिया चे प्रमुख दिनेश गवळे यांनी दिला आहे. निवेदन सादर करताना प्रदेश महासचिव अरशाद लखपती, मराठवाडा अध्यक्ष सुनील खरात, प्रदेश सचिव सुरेश दाभाडे, कामगार विंग मराठवाडा अध्यक्ष संतोष उणवणे, कामगार विंग जिल्हाध्यक्ष रवि मोरे, जिल्हाध्यक्ष रणजीत मनोरे, जिल्हा सरचिटणीस अमित मोरे आणि पूर्व शहर अध्यक्ष गणेश गवरय्ये उपस्थित होते.
📲Get App