🔥 TRENDING HAM(S) to Contest 20-25 Seats in 2027... Hindustani Awam Morcha (Secular) Targe... Anurag Agarwal appointed interim DGP o... Meghalaya supports 8,000 artists, aims... Meghalaya Holds Inaugural Global Respo... Restaurant Owner Shot in Road‑Rage Inc...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

पाटसमध्ये पहाटे फ्लॅट फोडून १० लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; चोरट्यांचा धुमाकूळ!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 10 Nov 2026, 01:37 PM 👁 169
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दौंड तालुक्यातील पाटस येथील आंबिकानगर परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना

पाटसमध्ये पहाटे फ्लॅट फोडून १० लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; चोरट्यांचा धुमाकूळ!

पुणे जिल्हा प्रतिनिधी 10 नोव्हेंबर 2026

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील आंबिकानगर परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्री प्राईड अपार्टमेंटमधील एका फ्लॅटचे कुलूप व दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १० लाख ६० हजार ३३२ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांपासून ते ४ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी श्री प्राईड अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील शिक्षक संभाजी थोरात यांच्या फ्लॅटला लक्ष्य केले. चोरट्यांनी सेफ्टी दरवाजाचा लोखंडी कोयंडा तोडून तसेच कटावणीच्या साहाय्याने मुख्य दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे लॉकर उचकटून त्यामधील सोन्याचे मौल्यवान दागिने चोरून नेले.

सोन्याचे टॉप्स, रिंगा, हार, नेकलेससह लाखोंचा ऐवज लंपास

या चोरीमध्ये सोन्याचे टॉप्स, रिंगा, हार, नेकलेस, अंगठ्या तसेच इतर सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून, एकूण १० लाख ६० हजार ३३२ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी शेजारील दिनेश जाधव यांच्या फ्लॅटमध्येही चोरीच्या उद्देशाने प्रवेश केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यवत पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११३५/२०२६ अन्वये दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करीत आहेत.

पाटस परिसरातील अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान आता यवत पोलिसांसमोर आहे. परिसरातील नागरिकांनी घरांच्या सुरक्षेबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
📲Get App