🔥 ट्रेंडिंग संपथ कुमार बने मेघालय के मुख्य सचिव Kannada Spirit Fills Jalahalli: Grand... मेघालय सरकार ने आज रोपवे पर चर्चा के ल... भारतीय महिला हॉकी टीम ने एशियन चैंपियं... उज्जैन मेले में गधे ने 26,000 रुपये की... एमपी को दो एग्रीकल्चर क्लस्टर और दो से...
25 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
राजनीति

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’चा जागर प्रत्येक वॉर्डात करा; आमदार किसन कथोरे यांचे कार्यकर्ते व नागरिकांना आवाहन.

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 25 नव. 2026, 10:02 PM 👁 28
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले सह तालुका रिपोर्टर: किशोर पवार (मुरबाड)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’चा जागर प्रत्येक वॉर्डात करा; आमदार किसन कथोरे यांचे कार्यकर्ते व नागरिकांना आवाहन
मुरबाड / बदलापूर:
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय आणि प्रेरणादायी जनसंवाद कार्यक्रमाचे १४० वे थेट प्रक्षेपण येत्या रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड व बदलापूर तालुक्यातील प्रत्येक गावात, बूथवर आणि आपापल्या वॉर्डात करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाच्या विकासाची दिशा, लोककल्याणकारी योजना आणि सामान्य नागरिकांचे प्रेरणादायी अनुभव मांडत असतात. हे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, यासाठी या कार्यक्रमाचे व्यापक स्तरावर आयोजन होणे गरजेचे आहे. या उपक्रमात बूथवरील सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रत्येक वॉर्डातील कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील नागरिकांना या कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण देऊन हा जनसंवाद यशस्वी करावा, असे निर्देश आमदार कथोरे यांनी दिले आहेत.
डिजिटल नोंदणी आणि छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन:
कार्यक्रमाच्या सुसूत्र नियोजनासाठी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून ‘सरल अ‍ॅप’ (Saral App) डाउनलोड करून आपली संपूर्ण प्रोफाईल अद्ययावत करावी. रविवारी कार्यक्रम पार पडल्यानंतर या अ‍ॅपवरील ‘मन की बात’ या पर्यायावर क्लिक करून कार्यक्रमाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे अपलोड करावेत. तसेच, अ‍ॅपवर माहिती पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आपापल्या मंडल अध्यक्षांना आणि आमदार कार्यालय, बदलापूर व मुरबाड येथे पाठवावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या या आवाहनानंतर मुरबाड आणि बदलापूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, गावागावांत व वॉर्डांमध्ये या कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
📲Get App