🔥 TRENDING Guwahati Authorities Remove Unauthoriz... ભોરડું સ્ટેશન ચોકડી પાસે ટ્રેક્ટરે કાર... Goods Train Derailment Disrupts Assam'... Amritsar Shooting: Dispute Over Child... Lifetime Devotion to Guru Nanak: Bhai... अनंत सिंह की बेटी की शादी हुआ बवाल
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sarkari Yojana

पशुपालकांसाठी मोठी संधी! ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६’ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 28 Nov 2026, 12:14 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुंबई, दि. २८ नोव्हेंबर २०२६ (मुंबई नीड २४ न्यूज महाराष्ट्र):
विशेष वृत्त
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी आणि पशुपालकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६’ अंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. २६ नोव्हेंबर २०२६ पासून MahaDBT 2.0 पोर्टलवर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक पशुपालकांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि अनुदान:
• कोणत्या व्यवसायांसाठी मिळणार लाभ? या योजनेअंतर्गत दुग्धव्यवसाय (२, ४, ५ किंवा ६ दुभत्या गाई/म्हशींचा गट), शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन तसेच मुरघास (चारा) निर्मिती प्रकल्पांसाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे.
• अनुदानाचे प्रमाण: या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, तर अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा केले जाईल.
• निवड पद्धत: या योजनेत लॉटरी पद्धतीऐवजी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come, First Served) या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे:
१. MahaID आणि फार्मर आयडी (Farmer ID): महाडीबीटी २.० पोर्टलवर लॉग-इन करण्यासाठी MahaID अनिवार्य आहे.
२. आधार कार्ड (मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेले) व रेशन कार्ड.
३. आधार लिंक असलेल्या सक्रिय बँक खात्याचे पासबुक.
४. जमिनीचा अद्ययावत ७/१२ आणि ८-अ उतारा (लागू असल्यास).
५. जातीचा दाखला (मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी).
६. पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी केल्याचा तपशील (जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून अद्ययावत करून घ्यावा).
अर्ज कुठे आणि कसा करावा?
पशुपालकांनी शासनाच्या अधिकृत MahaDBT 2.0 पोर्टलवर जाऊन ‘पशुसंवर्धन विभागाच्या योजना’ या पर्यायाअंतर्गत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ निवडून आपला अर्ज सादर करावा. तसेच, जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावरूनही अर्ज करता येईल.
अधिक माहिती व तांत्रिक मदतीसाठी पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा महाडीबीटी हेल्पलाईन ०२२-६१३१६४१२ वर संपर्क साधावा.
📲Get App