🔥 TRENDING Haryana Pan Masala Firm Evades Rs 116.... Haryana's Saini Highlights Jobs, Inves... Former Haryana Minister Phool Chand Mu... Rajasthan and MP Hit 6°C & 7°C as Fog... CG HC Criticises Bilaspur Municipal Co... SBI Clerk 2026 Prelims Cut‑Off Marks R...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Viral & Trending

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग; ५० ते ६० हून अधिक दुकाने जळून खाक!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 18 Nov 2026, 12:03 PM 👁 95
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

या दुर्घटनेत अंदाजे ५० ते ६० हून अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग; ५० ते ६० हून अधिक दुकाने जळून खाक!

पुणे प्रतिनिधी : १८ नोव्हेंबर २०२६

पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील जय वंधक शाळेजवळ मध्यरात्री सुमारे २ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास लाकडी साहित्य असलेल्या दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत अंदाजे ५० ते ६० हून अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेऊन जवानांनी युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू केले. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

या भीषण आगीत दुकानांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारील वसाहतींना आगीची झळ पोहोचू नये यासाठी विशेष प्रयत्न केले.

सध्या घटनास्थळी आग पूर्णपणे विझविण्यासाठी थंडावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती व नुकसानीचा तपशील घेण्याचे काम सुरू आहे.

मध्यरात्री घडलेल्या या आगीच्या दुर्घटनेमुळे टिंबर मार्केटमधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आगीच्या कारणाचा तपास होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲Get App