🔥 TRENDING Himachal Pradesh Legislative Assembly... Governor Opens Winter Travel Exhibitio... Yogi Adityanath's Mother Passes Away a... Chief Minister to Depart for Uttarakha... 27-Year-Old Arrested After Impersonati... Bulgarian Foreign Minister Velislava P...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Jobs & Career

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवे अधिकारी

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 13 Nov 2026, 05:08 PM 👁 213
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवे अधिकारी

पुणे : प्रतिनिधी | 13 नोव्हेंबर 2026

पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे पुणे शहर पोलीस दलातील काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखपदांमध्येही बदल झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे आता नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मारुती खेडकर यांच्याकडे लष्कर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची खडक पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रशासकीय फेरबदलांमुळे पुणे शहर पोलीस दलातील महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, संबंधित अधिकारी लवकरच आपल्या नव्या पदांचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

या बदलांमुळे पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या कामकाजात कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲Get App