🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सूर्यकांत किंद्रे यांचे बिनविरोध निवड

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 19 Nov 2026, 01:09 AM 👁 91
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर : पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या दक्षिण विभाग अध्यक्षपदी भोरच्या सूर्यकांत पांडुरंग किंद्रे (रा. रायरी) मा. भोर तालुका अध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या निवडीमुळे भोर तालुका पत्रकार संघाला जिल्हा संघावर मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीत इंदापूर-बारामती येथील राजकुमार थोरात आणि पुरंदरचे प्रकाश फाळके यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.. दौडचे जीवन शेंडकर हे सरचिटणीस म्हणून काम पाहतील.. कोषाध्यक्ष म्हणून मुळशी येथील विनोद मांझिरे काम पाहतील.. जिल्हा प्रतोद म्हणून बंडू दातीर कार्यभार सांभाळतील..
एम. जी. शेलार यांची परिषद प्रतिनिधी म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे तर राजेंद्र गवळी आणि दत्तात्रय भोंगळे यांना परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याबद्दल सूर्यकांत किंद्रे यांची भोर तालुक्यातुन विविध संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून सत्कार आणि कौतुक करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवार आज भोर तालुका पत्रकार संघातर्फे त्याचा सत्कार करण्यात आला याबरोबर अध्यक्ष सूर्यकांत किंद्रे यांनीही बोलताना आपण जिल्ह्याची जबाबदारी निष्पक्ष आणि काटेकोरपणे पार पाडणार असून पत्रकार संघासाठी सदस्य वाढवीण्याची जबाबदारी आणि भोर तालुका पत्रकार संघासाठी पत्रकार भवन उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असून सर्वांना बरोबर घेऊन व सर्वांच्या अडचणींना पाठीशी उभे राहन्याची खात्री दिली. कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार ढवळे सर यांनी निवेदक म्हणून सुंदर असे प्रास्ताविक केले. यावेळी भोर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
📲Get App