🔥 TRENDING ଅକୱାନ' ପାଇଁ ସୁଦୃଢ଼ କରାଗଲା ଟେଲିକମ୍ ନେଟୱ... ବାତ୍ୟା ମୁକାବିଲା ପାଇଁ ଗଞ୍ଜାମ ପ୍ରଶାସନର ବ... बावत्रा के पदरु पायु स्कूल में शिक्षक... जालौर में पंचायती राज चुनाव के परिणाम... ଆଜି ସ୍ଥଳଭାଗ ଛୁଇଁବ ବାତ୍ୟା ‘ଅକଭାନ’; ଆଶ୍ର... ସ୍ଥଳଭାଗ ଅତିକ୍ରମ କଲା ‘ଅକ୍ୱାନ’, ଗଞ୍ଜାମ ବ...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नांदणीत १३ व १४ नोव्हेंबर रोजी बिरलिंगेश्वर-महालिंगेश्वर यात्रा महोत्सवाचे आयोजन

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 12 Nov 2026, 04:40 PM 👁 63
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नांदणीत १३ व १४ नोव्हेंबर रोजी बिरलिंगेश्वर-महालिंगेश्वर यात्रा महोत्सवाचे आयोजन
नांदणी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे श्री बिरलिंगेश्वर व श्री महालिंगेश्वर यांच्या यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १३ व शनिवार दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा यात्रेचे दहावे वर्ष असून, यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता गंगास्थळाचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ४ वाजता श्री बिरलिंगेश्वर व श्री महालिंगेश्वर पालख्यांसह विजापूर फुलांचे आगमन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता बाहेरील सर्व पालख्यांचे आगमन होईल.
शुक्रवारी रात्री १० वाजता बिरलिंगेश्वर गायन संघ, कारकल (ता. दक्षिण सोलापूर) आणि श्री अप्पासिद्ध गायन संघ, गुणकी (जि. विजापूर) यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मुख्य गायक कांचना कारकल व अभिषेक गुणकी हे आपली कला सादर करणार आहेत.
शनिवारी सकाळी अभिषेक सोहळा, त्यानंतर केदारलिंगेश्वर बाल संघ, यमकानूर (ता. आळंद, जि. विजापूर) तसेच दुर्गा देवी गोविंद कुणिता कला संघ, सारवाड (ता. यड्रामी) यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता सर्व पालख्यांचा जंगी भेट कार्यक्रम होणार असून, रात्री ७ वाजता चित्र-विचित्र शोभेचे दारूकाम आयोजित करण्यात आले आहे.
यात्रेत श्री बिरलिंगेश्वर पालखी, श्री महालिंगेश्वर पालखी (नांदणी), श्री रेणुकासिद्ध पालखी (डोळकणी), श्री ब्रह्मदेव पालखी (चिंचपूर), श्री धुळी महाकालेश्वर पालखी (शिंगणगाव), श्री लामगव्वा देवी पालखी (लवंगी) आणि श्री जेटिंगराया पालखी (विनायकनगर) सहभागी होणार आहेत
यात्रेनिमित्त १३ व १४ नोव्हेंबर रोजी दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी, नांदणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App