🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

निरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन!

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 13 Nov 2026, 03:34 PM 👁 72
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

निरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन!

निरा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन!

इंदापूर व माळशिरस तालुक्यातील निरा नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याचे पाणी, शेतीचे सिंचन आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर निरा नदीत तातडीने पाणी सोडावे व नदीवरील बंधारे भरून द्यावेत, या मागणीसाठी सराटी (ता. इंदापूर) येथे श्री संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर आयोजित रास्ता रोको आंदोलन झाले.

नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन निरा नदीत पाणी सोडण्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी केली.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, मा. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App