🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

मुरबाडच्या ग्रामीण व आदिवासी खेड्यापाड्यांत बलिप्रतिपदेचा पारंपरिक जल्लोष 'ढोरं उडवण्याच्या' प्रथेसह बैलांच्या झुंजींनी रंगला दिवाळी पाडवा.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 12 Nov 2026, 07:55 PM 👁 82
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
मुरबाडच्या ग्रामीण व आदिवासी खेड्यापाड्यांत बलिप्रतिपदेचा पारंपरिक जल्लोष
'ढोरं उडवण्याच्या' प्रथेसह बैलांच्या झुंजींनी रंगला दिवाळी पाडवा
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दीपावली विशेष वृत्त
मुरबाड, दि. १३ (वार्ताहर): मुरबाड तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी खेड्यापाड्यांत बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा अत्यंत पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी व शेतकरी बांधवांनी आपली शेकडो वर्षे जुनी परंपरा जपत हा सण मोठ्या आनंदात साजरा केला.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी गोठ्यातील जनावरांची विधिवत पूजा केल्यानंतर, पाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाला नैसर्गिक रंग लावून आणि पारंपरिक साजशृंगार करून सजवले होते. तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्या आणि गावांमध्ये 'ढोरं उडवली' जाणाऱ्या आगळ्यावेगळ्या परंपरेनिमित्त बैलांच्या, तर काही ठिकाणी रेड्यांच्या झुंजींचे आयोजन करण्यात आले होते. हा थरार पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि बाहेरगावच्या प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
झुंजी सुरू होण्यापूर्वी गावाच्या व पाड्याच्या मुख्य रस्त्यावर शेकोटी पेटवून त्यावरून जनावरे ओलांडण्याची प्राचीन प्रथा सर्वत्र पाळण्यात आली. जनावरांच्या पायांनी तुडवलेल्या या शेकोटीतील विभूती ग्रामस्थांनी श्रद्धेने आपल्या कपाळाला लावली. यासोबतच खेड्यापाड्यांत रांगोळी स्पर्धा, पारंपरिक नृत्य-गायनाचे कार्यक्रम आणि शेतात पिकवलेल्या रताळे व चवळीच्या पारंपरिक फराळाने संपूर्ण तालुक्यात दिवाळीचा उत्साह द्विगुणित झाला होता.
📲Get App