🔥 TRENDING डिह थाना क्षेत्र में 5 अक्टूबर की मारप... Grand Celebration of the 71st Kannada... बीजेपी नेता राजू फर्ट्याल की कार दुर्घ... ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯರ ವೇತನ ₹15 ಸಾವಿರಕ್ಕೆ ಹೆ... ಜಾಲಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನ.25ರಂದು ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ 71ನ... Tur arrivals kick off in Karnataka and...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. किसनजी कथोरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे; मुख्यमंत्र्यांना १० हजार पत्रे पाठवण्याची मोहीम सुरू.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 23 Nov 2026, 09:27 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक २४/११/२०२६.
विशेष वृत्त ठाणे,
मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. किसनजी कथोरे यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात यावे, अशी आग्रही मागणी कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. मुरबाड मतदारसंघासह आजूबाजूच्या परिसराचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साधण्यासाठी ही मागणी करण्यात येत असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल १०,००० पत्रे पाठवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आदर्श तायडे यांनी या पत्र मोहिमेसाठी पुढाकार घेतला असून, त्यांनी आपली ही भूमिका जाहीर केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुरबाड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
"मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या आणि लगतच्या परिसराच्या विकासासाठी आमचे लोकप्रिय आमदार तथा 'आप्पा साहेब' श्री. किसनजी कथोरे यांना कॅबिनेट मंत्रिपद नक्कीच मिळेल, असा ठाम विश्वास आमच्या मनात आहे," असे आदर्श तायडे यांनी या मोहिमेदरम्यान म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावरही '#आप्पांना_कॅबिनेट_मंत्री_पद_मिळालंच_पाहिजे' हा हॅशटॅग वापरून या मोहिमेचा जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे.
📲Get App