🔥 TRENDING Gujarat Students Shift Focus Back to T... Karnataka Governor Calls for CSR Focus... Karnataka's Lok Sabha Seats May Remain... Karnataka High Court Orders Reinstatem... मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने बलरामपुर... Gujarat Refinery Expands: Acquires 200...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Lifestyle

मोहप तलावावर पाणीटंचाईचे सावट: "भाजीपाला व पिकांसाठी पाणी सोडू नका"; शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाला साकडे.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 28 Nov 2026, 11:19 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २८/११/२०२६.
विशेष वृत्त
मुरबाड (प्रतिनिधी): मुरबाड तालुक्यातील मोहप पाझर तलावात पिण्याच्या पाण्याचा साठा अत्यंत मर्यादित शिल्लक राहिल्याने परिसरातील गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजीपाला व इतर शेतीच्या पिकांसाठी जलाशयातून पाणी सोडू नये, अशी ठाम आणि आग्रही मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी एकत्र येत पाटबंधारे विभागाला अधिकृत निवेदन सादर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहप पाझर तलावावर मोहपसह नारायणगाव, नागाव, डांगुर्ले, शिवळे आणि वडाचापाडा या सहा गावांतील हजारो नागरिकांची आणि पाळीव जनावरांची पिण्याच्या पाण्याची तहान अवलंबून आहे. या तलावाच्या निर्मितीला अनेक वर्षे उलटून गेली असून, मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे तलावाची नैसर्गिक पाणी साठवण क्षमता आधीच कमी झाली आहे. अशातच यंदा तलावात उपलब्ध असलेला पाणीसाठा मर्यादित असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
सद्यस्थितीत तलावातील उर्वरित जलसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच राखीव ठेवणे नितांत गरजेचे आहे. जर भाजीपाला लागवड किंवा इतर पिकांसाठी तलावातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला, तर जलसाठा झपाट्याने संपुष्टात येईल. परिणामी, या सहा गावांतील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पिण्याच्या पाण्याचे हे संभाव्य संकट टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेतीसाठी पाणी सोडू नये, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाला निवेदन दिले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या या रास्त मागणीची तातडीने दखल घेऊन तलावातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
📲Get App