🔥 ट्रेंडिंग पाकिस्तान के जलवायु परिवर्तन मंत्री शं... କାଲିମେଳାରେ ବନ ବିଭାଗର ବଡ଼ ଚଢ଼ାଉ: ୩୯୦ଟି... उत्तarakhand हाई कोर्ट ने सेवानिवृत्त... साउथ दिल्ली तैयार, आज रात 20 शादियाँ,... दिल्ली ने 100 इलेक्ट्रिक बसें जोड़ीं,... पाकिस्तान के जलवायु मंत्री ने SCO फोरम...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

लोणावळ्या मध्ये FDA ची मोठी कारवाई चार पंच तारिका हॉटेल्सला दणका

✍️ रिपोर्टर: सतिश हजारे 🗓 20 नव. 2026, 04:35 PM 👁 26
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अस्वच्छ स्वयंपाकघरे, झुरळांचा सुळसुळाट अन् निकृष्ट अन्नसाठा उघड; पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ!

लोणावळ्यातुन एक खळबळजनक बातमी: पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील नामांकित हॉटेल्समध्येच जर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असेल, तर पर्यटकांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा? हॉटेलच्या आकर्षक इमारती, आलिशान सजावट आणि महागड्या मेन्यूच्या आड अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आला आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थ, झुरळांचा वावर, अस्वच्छ स्वयंपाकघरे आणि निकृष्ट अन्नसाठा अशा गंभीर त्रुटी आढळल्यानंतर प्रशासनाने लोणावळ्यातील चार नामांकित हॉटेल्सवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत लोणावळ्यातील प्रमुख हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दि ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या चार हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या तपासणीत संबंधित हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांमध्ये धक्कादायक प्रकार समोर आले. मुदतबाह्य खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थांमध्ये अन्नरंगाचा वापर, झुरळांचा वावर, कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे, अस्वच्छ फ्रिज, पाणी साचणे आणि विनाझाकण कचरापेट्या अशा अनेक गंभीर त्रुटी आढळल्या.

दि ऑर्किड हॉटेलमध्ये स्वयंपाकघरात तसेच शीतगृहात दुधाची ११ मुदतबाह्य पाकिटे आढळली. याशिवाय कच्चे व शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे, स्वयंपाकघरात पाणी साचणे, अस्वच्छ फ्रिज आणि विनाझाकण कचरापेट्या अशा त्रुटी निदर्शनास आल्या.

रिदम हॉटेलमध्ये स्वयंपाकघर आणि बेकरी विभागात झुरळांचा वावर आढळला. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची स्वतंत्र साठवणूक केली जात नसल्याचे समोर आले. अन्नपदार्थ आणि सॉसच्या बाटल्यांवर आवश्यक लेबल नसणे तसेच पेस्ट कंट्रोलच्या नोंदी उपलब्ध नसणे अशा त्रुटीही आढळल्या.

बेसिलिका हॉटेलमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड आढळल्याने ते जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचेही निदर्शनास आले.

द फर्न हॉटेलमध्ये बेकरी उत्पादनासाठी मुदतबाह्य खाद्यरंग वापरला जात असल्याचे आढळले. हा रंग नष्ट करण्यात आला. याशिवाय स्वयंपाकघरात मृत आणि जिवंत झुरळेही आढळल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने चारही हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिल्याचे वृत्तात नमूद आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाने निलंबित करण्यासह रद्द करण्याचीही कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

लोणावळ्यात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. येथील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स हे पर्यटन व्यवसायाचे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतच गंभीर प्रश्न निर्माण होत असतील, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

केवळ हॉटेल्सच्या बाह्य सजावटीवर आणि आलिशान सुविधांवर भाळून चालणार नाही, तर ग्राहकांना दिले जाणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या या कारवाईनंतर इतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्येही नियमित तपासणी होणार का? तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य आस्थापनांवरही अशीच कठोर कारवाई होणार का, याकडे आता लोणावळेकरांसह पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

आलिशान हॉटेलच्या नावाखाली ग्राहकांच्या ताटात निकृष्ट अन्न वाढले जात असेल, तर अशा प्रकारांना आळा बसणे गरजेचे आहे. अखेर ग्राहकांचे आरोग्य महत्त्वाचे की हॉटेलचा झगमगाट? हा प्रश्न या कारवाईमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
📲Get App