Local
खेलो इंडिया स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भोर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना वेग; ३२५ कोटींचा निधी मंजूर

भोर, पुणे : जानेवारी महिन्यात पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकासाच्या कामांना वेग आला आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून, यामध्ये राजगड तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या कामांचाही समावेश आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून या रस्ते विकासाला गती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत जगभरातील विविध देशांमधील सायकलपटू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी या तीन तालुक्यांतून हा मार्ग जाणार आहे. या भागातील रस्ते विकासासाठी तब्बल ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून भोर विधानसभा मतदारसंघातील सुमारे १९४ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
सध्या या मार्गावरील विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून, स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कामांचा वेग वाढविण्यात आला आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यांतील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि परिसरातील विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील रस्ते विकासाला मिळालेली गती ही स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार असून, सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.