🔥 TRENDING નંદલાવ ગામમાં ટીબી સ્ક્રીનિંગ કેમ્પ: 1... Son of Legendary Action Star Fatally S... Digital Camera World Names 2026's Top... SS Rajamouli Praises Dulquer Salmaan’s... Summit Hotels & Resorts Becomes Title... Sikkim Gold Rates Rise on 20 Nov 2026:...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

कल्याण बाजार समितीतील भूखंड वाटप प्रकरण तापणार; आमदार किसन कथोरे हिवाळी अधिवेशनात मांडणार लक्षवेधी.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 17 Nov 2026, 07:55 PM 👁 101
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार
दिनांक १८/११/२०२६.
विशेष वार्ता पत्र
ठाणे कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यातील ५० गुंठे शासकीय भूखंडाचे नियमबाह्य वाटप झाल्याचा मुद्दा आता थेट विधिमंडळात गाजणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, आगामी हिवाळी अधिवेशनात या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे तत्कालीन प्रशासक आणि संबंधित व्यापारी संघटनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय?
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात असलेला सर्व्हे क्रमांक २८२ आणि २८४ मधील ५० गुंठे क्षेत्राचा शासकीय भूखंड एका व्यापारी संघटनेला देण्यात आला आहे. बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांनी या भूखंडाचे वाटप करताना पारदर्शकता आणि शासकीय नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप आहे. जून २०२५ मध्ये बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणुका पार पडल्या होत्या. तत्पूर्वीच्या प्रशासक राजवटीत हा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आणि अधिवेशनाचा इशारा
या अनियमिततेमुळे बाधित झालेल्या व्यक्तींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. या व्यवहाराशी संबंधित सर्व दस्तऐवज आणि पुरावे सादर केले जावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. केवळ तक्रारीवर न थांबता, या गंभीर प्रकरणावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याची भूमिका आमदार कथोरे यांनी घेतली आहे.
लवकरच तपास सुरू होणार
मुख्यमंत्री कार्यालयाने या तक्रारीची अधिकृत नोंद घेतली असून, या प्रकरणाची लवकरच सखोल चौकशी सुरू केली जाईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता अधिवेशनातील लक्षवेधीच्या इशाऱ्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत.
📲Get App