🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

किल्ले गोरखगडावर दिव्यांची आरास; पर्यटन आणि रोजगाराचा संदेश देत सलग ९ व्या वर्षी दीपोत्सव साजरा.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 12 Nov 2026, 09:18 AM 👁 94
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्युज महाराष्ट्र | विशेष वृत्त
किल्ले गोरखगडावर दिव्यांची आरास; पर्यटन आणि रोजगाराचा संदेश देत सलग ९ व्या वर्षी दीपोत्सव साजरा
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे.
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक १२/११/२०२६.
मुरबाड (प्रतिनिधी):
ठाणे जिल्हा ट्रेकर्स असोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या निमित्ताने मुरबाड तालुक्यातील किल्ले गोरखगडावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या हस्ते हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
मध्यरात्रीची आरती आणि गडचढाई
या उपक्रमाची सुरुवात मध्यरात्रीच्या सुमारास गोरक्षनाथ मंदिर मठाधिपती प.पू. हरेशनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आरतीने झाली. मंदिरामध्ये पाच दिवे लावून चढाई मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व ट्रेकर्सची ओळख करून घेऊन त्यांना ट्रेकिंगच्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर गोरक्षनाथ मंदिरापासून गडचढाईला सुरुवात झाली आणि गडावरील मंडप येथे सर्वांचा मुक्काम झाला.
सूर्याच्या पहिल्या किरणासोबत दीपोत्सव
पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणासोबत गोरखगडाच्या माथ्यावरील मंदिरातील शिवलिंगाजवळ शेकडो दीप प्रज्वलित करून मुख्य दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. या प्रकाशोत्सवामुळे संपूर्ण गड परिसर उजळून निघाला होता.
पर्यटन आणि रोजगाराचा मुख्य उद्देश
"ठाणे ग्रामीण जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. गडकिल्ल्यांवरील पर्यटन वाढवण्यासाठी आणि त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मागील आठ वर्षांपासून शेकडो साहसी पर्यटकांना सोबत घेऊन हा दीपोत्सव उपक्रम राबवला जात आहे," असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी यावेळी केले.
आयोजन समितीचे विशेष परिश्रम
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेकर्स असोसिएशनचे अनिल चिराटे, ॲड. दिनेश सासे, नानू चिराटे, साईनाथ कंटे, गुरुनाथ देशमुख, गुरुनाथ माळी, हर्षल खारीक, हरेश पवार, सागर कराले आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
📲Get App