🔥 TRENDING हजारीबाग में अवैध शराब पर छापामारी, 34... Meghalaya Government Withdraws Coal Mi... Tripura HC Dismisses FIR Against TMC L... BJP to Open 34th Permanent Unit Office... Three Rare Bird Species Spotting at Su... Himachal Pradesh to Impose Uniform Rat...
26 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

गोवेली ते आळंदी पायी दिंडी सोहळा २०२६ चे उत्साहात प्रस्थान; माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती..

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 26 Nov 2026, 05:44 PM 👁 23
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले सह किशोर पवार मुरबाड
दिनांक २६/११/२०२६.ठाणे
मुरबाड (प्रतिनिधी) :
कल्याण तालुका कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळ, कल्याण, जि. ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'गोवेली ते आळंदी पायी दिंडी सोहळा २०२६' चे बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात प्रस्थान झाले.
या प्रस्थान सोहळ्यास ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक श्री. सुभाष गोटीराम पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सर्व वारकरी बांधवांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. "विठ्ठल नामाच्या गजरात सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास सर्व वारकरी बांधवांसाठी सुखकर व मंगलमय होवो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना," अशा भावना श्री. सुभाष पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.
टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्याप्रसंगी श्री. अरुण पाटील, श्री. रामभाऊ दळवी अण्णा, श्री. रविंद्र घोडविंदे, श्रीम. स्मिता घोडविंदे, श्री. रविंद्र टेंभे, श्री. राहुल कोर, श्री. किसनराव तारमले, श्री. विश्वनाथ जाधव, श्रीम. जयश्रीताई सासे, श्री. प्रकाश भोईर, श्री. पद्माकर हरड, श्री. गणेश चोरगे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
📲Get App