🔥 TRENDING Vaishali Admin Issues Traffic Advisory... Jiri News Network Celebrates Its 22nd... Analyst Ambareesh Baliga Picks Arvind,... TrueRE Oriana to Invest Rs 750 Cr in F... Uttar Pradesh Revamps Tourism Policy t... Police Capture Murder Suspects in Zira...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

गावाच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार; धनराज भाऊ भडके ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार!

✍️ Reporter: DOCTOR PINTU PAUL 🗓 09 Nov 2026, 04:56 PM 👁 112
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गावाच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार; धनराज भाऊ भडके ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार!

गावाच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार; धनराज भाऊ भडके ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार!
चिचपल्ली : गावाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करणे आणि गावामध्ये नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे, या उद्देशाने चिचपल्ली येथील श्री. धनराज बटाऊ भडके यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
यासंदर्भात त्यांनी NEED 24 NEWS शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. आजपर्यंत ज्या उमेदवारांना आपण आणि आपल्या पॅनेलने सहकार्य करून निवडून आणले, त्यांनी निवडून आल्यानंतर गावाच्या विकासाकडे अपेक्षित लक्ष दिले नाही, अशी खंत धनराज भडके यांनी व्यक्त केली.
गावातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकासकामे, स्वच्छता, शिक्षण, ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रश्न यांना प्राधान्य देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन उत्साह, नवा जोश आणि गावाचा विकास हेच ध्येय! या विचाराने आपण कोणत्याही राजकीय पॅनेलच्या दबावाखाली न राहता स्वतंत्रपणे ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गावाच्या विकासासाठी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, जबाबदारी आणि नैतिकता असली पाहिजे. गावातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आश्वासनही त्यांनी चिचपल्लीच्या ग्रामस्थांना दिले.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज बटाऊ भडके यांच्या स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या भूमिकेमुळे चिचपल्ली गावातील स्थानिक राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
📲Get App