स्थानीय
गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावर ट्रक-दुचाकीची भीषण धडक, एकाचा जागीच मृत्यू
गडचिरोली-चंद्रपूर महामार्ग NH 930 वर चिचपल्ली येथील दूध नाल्याजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
गडचिरोली-चंद्रपूर महामार्ग NH 930 वर चिचपल्ली येथील दूध नाल्याजवळ आज दिनांक 26 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी असलेल्या ट्रकचा क्रमांक MH34 BG 8086 असा आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळली असून पंचनामा करण्यात आला आहे.
अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. NEED 24 NEWS कडून आवाहन केले आहे की, रात्रीच्या वेळी महामार्गावर वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी आणि वेगावर नियंत्रण ठेवावे.