🔥 TRENDING નંદલાવ ગામમાં ટીબી સ્ક્રીનિંગ કેમ્પ: 1... Son of Legendary Action Star Fatally S... Digital Camera World Names 2026's Top... SS Rajamouli Praises Dulquer Salmaan’s... Summit Hotels & Resorts Becomes Title... Sikkim Gold Rates Rise on 20 Nov 2026:...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

एफडीएने श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अक्कलकोटमधील कारवाईत मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांकडून, निकृष्ट दर्जाच्या असल्याचा संशय असलेली ८५० किलो मिठाई जप्त केली.

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 18 Nov 2026, 08:59 AM 👁 44
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

एफडीएने श्री स्वामी समर्थांच्या भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अक्कलकोटमधील कारवाईत मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांकडून, निकृष्ट दर्जाच्या असल्याचा संशय असलेली ८५० किलो मिठाई जप्त केली.

सोलापूर: श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने पेढा उत्पादक आणि मिठाई विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे.या कारवाईत अडीच लाखांचा एकूण ८५० किलो पेढा व मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. तसेच चार आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, मुख्य पुरवठादाराचा अन्न परवाना आणि अन्य एका आस्थापनेची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.
एफडीए पथकाने अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार रंगोली स्वीट मार्टचे समीर बडेसाहब मकानदार यांच्या आस्थापनेत अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक , लेबलविषयक नियमांचे उल्लंघन, अन्न सुरक्षा व मानके नियमांतील तरतुदींचे उल्लंघन तसेच मिठाईचा दर्जा निकषांनुसार नसल्याचा संशय आढळून आला . या ठिकाणाहून ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा असा एकूण ८२९ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे. या कारवाईमुळे अक्कलकोटमधील मिठाई उत्पादक, विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
📲Get App