🔥 TRENDING બનાસકાંઠા જિલ્લામાં અંબાજી ગામની બેનની... Punjab Police Constable 2026 Exam Sche... Punjab Leader Pargat Confirms Welfare... Gold and Silver Prices Hold Steady in... Guwahati Police Remove Unauthorized As... Veteran Buddhist Scholar Dr A Pannasar...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे! देशात पहिलाच प्रयोग?

✍️ Reporter: Doctor Pintu Paul 🗓 28 Nov 2026, 07:51 PM 👁 39
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वाघांची वाढती संख्या आणि मानव-वाघ संघर्ष रोखण्यासाठी चंद्रपूर वन विभागाने वाघांच्या नसबंदीचा विशेष प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

चंद्रपूर : वाघांची वाढती संख्या आणि मानव-वाघ संघर्ष रोखण्यासाठी चंद्रपूर वन विभागाने वाघांच्या नसबंदीचा विशेष प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. असा प्रस्ताव पाठवणारा चंद्रपूर हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.

मुल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी चंद्रपूर वन विभागाच्या मुख्यालयावर धडक मारली होती. त्यावेळी मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनीच या प्रस्तावाची माहिती दिली. 94e0

ताडोबा-अंधारीसह जिल्ह्यात जवळपास ३५० वाघ असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गावांजवळ वाघांचा वावर वाढला आहे, माणसांवर आणि पाळीव जनावरांवर हल्ले वाढले आहेत.

वन विभागाने याला वाघांची ‘फॅमिली प्लानिंग’ असं म्हटलं आहे. पण एकीकडे वाघ वाचवा म्हणायचं आणि दुसरीकडे नसबंदी करायची, यावरून व्याघ्रप्रेमींमध्ये संतापही आहे.

आता केंद्र सरकार या प्रस्तावाला परवानगी देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
📲Get App