🔥 ट्रेंडिंग दिल्ली नर्सरी प्रवेश 2027: आवेदन 1 दिस... बिहार के मुख्यमंत्री सम्राट चौधरी ने 2... बिहार के महाबोधि मंदिर से बोधगया के सभ... महाकाल मंदिर में रात्री अनुष्ठान, गोपा... नागौर में शादी के निमंत्रण के बहाने पु... चक्रवात और तूफान से उत्पन्न स्थिति
23 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
टेक्नोलॉजी

चंद्रपूर-गडचिरोलीत जिओच्या महागड्या रिचार्ज आणि स्लो इंटरनेटमुळे ग्राहक त्रस्त

✍️ रिपोर्टर: Doctor Pintu Paul 🗓 23 नव. 2026, 07:45 AM 👁 30
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रिलायन्स जिओकडून रिचार्जचे दर वाढवले जात असताना 4G ग्राहकांना अपेक्षित इंटरनेट सेवा मिळत नसल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मोबाईलधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्वतःला सर्वोत्तम कंपनी म्हणवणाऱ्या रिलायन्स जिओकडून ग्राहकांना अपेक्षित इंटरनेट सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रिचार्जचे दर वाढवले जात असताना ग्राहकांना मात्र अपेक्षेप्रमाणे सेवा मिळत नसल्याचा आरोप चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मोबाईलधारकांकडून केला जात आहे.

विशेषतः 4G मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. महागडे रिचार्ज करूनही इंटरनेटचा वेग अत्यंत कमी असल्याने अनेक ग्राहकांना इंटरनेट वापरणे कठीण झाले आहे. दुसरीकडे, 5G मोबाईलधारकांना इंटरनेट सेवा मिळत असताना 4G ग्राहकांना मात्र वारंवार नेटवर्क आणि स्लो इंटरनेटच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे.

ग्राहकांच्या मते, पैसे भरून रिचार्ज केल्यानंतरही अपेक्षित सेवा मिळत नसेल, तर ग्राहकांनी भरलेल्या पैशांचा उपयोग तरी काय? वारंवार तक्रारी करूनही कंपनीकडून समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. या त्रासाला कंटाळून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्राहकांनी जिओ सिमकार्ड बंद करून इतर कंपन्यांच्या सिमकार्डकडे वळण्यास सुरुवात केल्याचेही सांगितले जात आहे.

याशिवाय, रिचार्जची मुदत संपल्यानंतर किंवा ग्राहकाने वेळेवर रिचार्ज न केल्यास सिमकार्ड बंद होण्याची भीती दाखवली जात असल्याच्या तक्रारीही काही ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत. ग्राहकांना जाहिराती नकोत, तर पैसे भरल्यानंतर दर्जेदार सेवा हवी, अशी मागणी केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची केंद्र सरकार, दूरसंचार विभाग (DoT) आणि संबंधित ग्राहक संरक्षण यंत्रणांनी दखल घेऊन जिओ कंपनीच्या नेटवर्क सेवेची गुणवत्ता, रिचार्ज दर आणि ग्राहकांच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील त्रस्त ग्राहकांकडून होत आहे.
📲Get App