स्थानीय
चिकलठाणमध्ये उजनी वाचवण्यासाठी दशक्रिया विधी; मच्छिमार-शेतकऱ्यांनी ए आय डेटा सेंटरविरुद्ध एल्गार केला
यहाँ देखें:
▶️ YouTube
चिकलठाणच्या गावकऱ्यांनी उजनी वाचवण्यासाठी दशक्रिया विधी केला, तर मच्छिमार व शेतकऱ्यांनी ए आय डेटा सेंटरच्या बांधकामावर विरोध केला.
चिकलठाण, ता. करमाळा | प्रतिनिधी
उजनी धरण परिसरात प्रस्तावित ए आय डेटा सेंटर व सोलर प्रकल्पाच्या विरोधात आज बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी चिकलठाण (ता. करमाळा) येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
कोटलिंगनाथ मंदिर परिसरात सकाळी १० वाजता मच्छिमार बांधव, शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात दशक्रिया विधी (दहावा) केला. या विधीद्वारे प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या विचारांचा आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला.
गेल्या काही आठवड्यांपासून उजनी परिसरात या प्रकल्पाविरोधात जनजागृती बैठका, ग्रामसभा, रस्ता रोको आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उजनीचे पाणी हे शेती आणि पिण्यासाठी आहे, डेटा सेंटरच्या कूलिंगसाठी नाही. तर मच्छिमार बांधवांचे म्हणणे आहे की, धरणातील पाण्यावर आणि मासेमारीवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, प्रकल्प आल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल.
या आंदोलनात चिकलठाणसह परिसरातील अनेक गावांतील मच्छिमार, शेतकरी, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “उजनी वाचवा, भविष्य वाचवा”, “उजनीचे पाणी शेतीसाठी, ए आय सेंटरला विरोध जनहितासाठी” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
प्रशासनाने मात्र डेटा सेंटरसाठी केवळ ०.४२ ते ०.५ टीएमसी पाणी लागणार असल्याचे म्हटले आहे, तर आंदोलकांनी पाण्याच्या वापरावरून आणि जमीन अधिग्रहणावरून चिंता व्यक्त केली आहे. आंदोलनानंतरही प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मच्छिमार कृती समिती व शेतकरी संघटनांनी दिला आहे.