🔥 TRENDING झालावाड़ के रमेश तंवर को 1.475 किलोग्र... Bhopal Court Orders 30-Day Hearing for... सोनपुर मेला में अपने विभाग के स्टॉल का... Indore Police Nab Bribery Plot Involvi... Four camels killed, one injured as tra... સુત્રાપાડા તાલુકા ના ધામળેજ ગામે બે જૂ...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

भव्य पायी दिंडी सोहळ्यात माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांची सदिच्छा भेट; वारकऱ्यांशी साधला आत्मीय संवाद

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 23 Nov 2026, 08:44 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे सह
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २४/११/२०२६.
नीड २४ न्यूज | विशेष वार्तापत्र
मुरबाड (ठाणे प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाची थोर परंपरा जपणाऱ्या श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर (म्हसा) ते श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ (चेरवली) या भव्य पायी दिंडी सोहळ्यास ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक श्री. सुभाष गोटीराम पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले आणि तालुक्याच्या सुख-समृद्धीसाठी व बळीराजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
ह.भ.प. श्री. रामभाऊ दळवी अण्णा यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या पायी दिंडी सोहळ्याचे अत्यंत नेटके व भव्य आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर म्हसा येथून प्रस्थान झालेल्या या दिंडीने विविध गावांमधून भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ चेरवली येथे मुक्काम केला. या संपूर्ण प्रवासात मुरबाड तालुक्यासह आसपासच्या परिसरातील असंख्य वारकरी बांधव, महिला व भाविक मोठ्या संख्येने आणि प्रचंड उत्साहाने सहभागी झाले होते.
या भेटीदरम्यान श्री. सुभाष पवार यांनी दिंडीत सहभागी झालेल्या सर्व वारकरी बांधवांशी अत्यंत आपुलकीने व आत्मीयतेने संवाद साधला, तसेच त्यांच्या प्रवासातील व मुक्कामाच्या ठिकाणच्या सोयीसुविधांची विचारपूस केली. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जप आणि "ज्ञानोबा माऊली तुकाराम" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.
यावेळी बोलताना श्री. सुभाष गोटीराम पवार म्हणाले की, "वारकरी संप्रदायाने समाजाला नेहमीच समतेचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा संदेश दिला आहे. अशा भव्य पायी दिंडी सोहळ्यांमुळे ग्रामीण भागात आध्यात्मिक चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या सोहळ्यात सहभागी होऊन वारकरी बांधवांची सेवा करण्याची आणि विठुरायाचे दर्शन घेण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे."
याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजक ह.भ.प. रामभाऊ दळवी अण्णा व सर्व वारकरी बांधवांचे श्री. पवार यांनी मनापासून कौतुक करून त्यांच्या पुढील आध्यात्मिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
📲Get App