🔥 ट्रेंडिंग 20 ਏਕੜ ’ਚ ਪਰਾਲੀ ਸੰਭਾਲ ਕੇ ਕਿਸਾਨ ਗੁਰਮੇਲ... મહીસાગરના બાગાયતી ખેડૂતો માટે ખુશખબર:... पूर्णिया लोकसभा क्षेत्र में विकास कार्... हिमाचल प्रदेश विधानसभा ने आज शीतकालीन... शिमला में शीतकालीन यात्रा प्रदर्शनी का... योगी आदित्यनाथ की माँ का निधन, 91 वर्ष...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धर्म

भोरमधून श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात, २३ नोव्हेंबरला अक्कलकोटला पोहोचणार

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 14 नव. 2026, 11:41 AM 👁 111
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पुण्यातील भोर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातून मोठ्या उत्साहात पालखी रथाचे प्रस्थान झाले आहे. हा पालखी सोहळा २३ नोव्हेंबरला अक्कलकोट येथे पोहोचणार असून भाविकांची गर्दी दिसून आली.

पुणे जिल्ह्यातील भोर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातून श्री स्वामी समर्थांच्या पालखी रथाचे प्रस्थान झाले आहे. भोर ते अक्कलकोट या मार्गाने होणाऱ्या या पालखी सोहळ्याला आज मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. हा पालखी सोहळा २३ नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे पोहोचणार असून, या प्रवासातून भाविकांना स्वामींचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

भोरच्या मंदिरातून सुरू झालेल्या या पालखी प्रस्थानावेळी परिसरात भक्तिमत् वातावरण पसरले होते. श्री स्वामी समर्थांच्या नामावलीत आणि जयघोषात परिसर न्हाऊन गेला. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या या पालखी सोहळ्याची परंपरा यावेळीही कायम ठेवण्यात आली आहे. मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

पुरुषांसह महिला भाविक स्वामी समर्थांच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. मोठ्या उत्साहात स्वामींच्या भेटीसाठी अक्कलकोटकडे मार्गस्थ होताना दिसून आले. पालखी रथ अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान करत असून, या पवित्र प्रवासात भाविकांचा सहभाग होत असल्याचे दिसून आले.
📲Get App