🔥 TRENDING Sakina Itoo Rejects New Delimitation,... GHMC Secures Rs 1,720 Cr LED Streetlig... टंडवा के बुकरू में रेलवे ब्रिज निर्माण... Yashoda Hospitals Hosts National Oncol... Dhruv Jurel Credits Lower-Order Belief... ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ಪೊಲೀಸರು ಅಭಿಷೇಕ್ ಬ್ಯಾನರ್ಜಿ...
29 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

भोरच्या वेळवंड खोऱ्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला; कोंडगाव-सांगवी परिसरात खळबळ

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 29 Nov 2026, 07:10 PM 👁 35
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर : वेळवंड खोऱ्यातील कोंडगाव-सांगवी गावांच्या हद्दीवर रविवारी (दि. २९) दुपारच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्थानिक नागरिकांना हा मृतदेह आढळून आला. या परिसराच्या दोन्ही बाजूंना जंगल असून पुढील गावांकडे जाणारा रस्ताही घनदाट जंगलातून जात असल्याने मृतदेह दिसताच स्थानिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने भोर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हा खून आहे की अपघात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

या घटनेमुळे कोंडगाव-सांगवीसह संपूर्ण वेळवंड खोऱ्यात चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
📲Get App